हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत असा परखड सवाल राज ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिलला दिवे लावायच्या आवाहनावरही राज यांनी मोदींना चिमटा काढला. पंतप्रधानांनी सांगितलं म्हणून लोक दिवेही पेटवतील. नाही तरी लोकांना सध्या काम नाही. श्रद्धा-अंधश्रद्धेचं सोडून द्या. त्यामुळं करोनावर परिणाम झाला तर चांगलंच आहे अशी कोपरखळी राज यांनी मोदींना मारली.
कोरोनावर कशी मात करायची अनेक बाबतीत सरकार संभ्रमात आहे. पुढं काय होणार आहे हे कोणालाच कळत नाहीये. हा संभ्रम संपवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे. कालच्या पंतप्रधानांच्या भाषणातून काहीतरी आशेचा किरण दिसायला हवा होता. मात्र, तसं काही झालच नाही अशी भावना राज यांनी यावेळी व्यक्त केली. आजपर्यँत आरोग्य खात्यावर कमीत कमी लक्ष दिलं गेल्यानं सध्या आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीय असं मत राज यांनी यावेळी मांडल. अत्यावश्यक सेवांची व्यवस्था सरकारनं योग्य पद्धतीनं केली पाहिजे.
काळा बाजार करणाऱ्यांना फोडून टाकलं पाहिजे. त्यांना अशा परिस्थितीत या गोष्टी सुचतात कशा? असा सवाल उपस्थितीत करत राज यांनी जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी सरकारला केली. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील अशी विनंती राज यांनी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.
धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. ही काळा बाजार करायची वेळ आहे का असं सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसंच पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजे. यांची हात उचलायची हिंमत होते कशी ? पोलिसांना तुम्ही शिव्या देता ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्र्यांना यावर कडक पावलं उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
लॉकडाउनची शिस्त पाळा अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण