हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही मुख्य नेत्यांसोबत बंड पुकारल्यानंतर आता मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या दरम्यानच मनसेसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपल्या विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संजय तुर्डे यांनी राजीनाम्याचे कारण देत सांगितले आहे की, पक्षाच्या कामाला वेळ देता येत नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही पक्ष सोडून कुठे ही जाणार नाही आहोत.संजय तुर्डे मनसेच्या महत्वपूर्ण नेत्यांमधील एक होते . त्यांनी घेतलेल्या या निर्णायाचा आता मनसेला मोठा धक्का बसला आहे. तुर्डे हे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत कलिना प्रभागातून निवडून आले होते. या निवडणूकीत मनसेच्या सात उमेदवारांनी विजय मिळवला होता. मात्र यातील सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर संजय तुर्डे हे मनसेसोबतच राहीले. परंतु आज तुर्डे यांनी विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता यापुढे मनसे काय खेळी खेळेल याकडे ही सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
दरम्यान, लवकरच मुंबई महालिकेसाठी निवडणूक जाहीर होऊ शकते. भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र असून आता त्यांना अजित पवारांचीही साथ मिळत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे नेमकी काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. मनसे सुद्धा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकार सोबतच निवडणूक लढवणार कि स्वबळाचा नारा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य आहे. तसेच सध्य्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना – मनसे युतीची चर्चाही सुरु आहे.