हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्त्यव्याला विरोध केल्यानंतर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनतर वसंत मोरे अन्य पक्षात जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच आता खुद्द राज ठाकरे यांनीच वसंत मोरे याना फोन करून शिवतीर्थ वर येण्याचा निरोप दिला आहे
वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे यांच्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वसंत मोरे याना फोन करून शिवसेना प्रवेशाचे निमंत्रण दिले, मात्र आता राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना शिवतीर्थ वर बोलावलं असून ते सोमवारी सकाळी शिवतीर्थवर जाणार आहेत.
वसंत मोरे यांनी यापूर्वीच आपण मनसे सोडणार नाही असे स्पष्ट केलं होत. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, असे वसंत मोरे यांनी म्हंटल.