मनसेचा ‘एकला चलो’ चा नारा; सर्व निवडणूका स्वबळावर लढवणार

Raj Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असून राज ठाकरेंच्या आदेशाने सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. त्यामुळे भाजप- मनसे- शिंदे गट या युतीच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही स्वातंत्र्य आहोत त्यामुळे सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे, असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेटीही झाल्याचे आपण बघितलं. येव्हडच नव्हे तर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील गणेश दर्शनासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोचले होते. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शिवसेनेला आणखी शह देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार अशा चर्चा रंगल्या होत्या, मात्र आम्ही सर्व उमेदवार उभे करू असं म्हणत संदीप देशपांडे यांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.