हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
भाजप नेते माधव भांडारी यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे. मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.#RepublicDay2022 pic.twitter.com/9ntY1Wn1LQ— Madhav Bhandari (@Madhavbhandari_) January 16, 2022
भाजप सरकारने यापूर्वीहीअनेक तारखांना महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केल्या आहेत. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे.