हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू मुळे जनतेची चिंता वाढली. त्यातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत असून अपुऱ्या आरोग्य यंत्रणांमुळे सरकार हतबल झालं. यावरून देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असून आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर 1 गंभीर आरोप केला आहे. कोरोना मुळे झालेल्या मृत्यूसाठी मोदीच जबाबदार आहेत असा घणाघात त्यांनी केला आहे.
ओवैसी म्हणाले, मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ 3.2 कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि 16 कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.