सीमावादाप्रश्नी बसवराज बोम्मईंविरोधात खासदार धैर्यशील मानेंची मोदींकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Darisheel Mane Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदेकडून काहीच ऍक्शन घेतली जात नसल्याने अखेर खासदार धैर्यशील माने यांनी थेट पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांना पत्र देत बोम्मई यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर खा. मानेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती द्यायची होती. तसेच सध्या चिघळत चाललेल्या सीमाप्रश्नावर त्यांची मुद्दामहून भेट घेतली. यावेळी सीमाभागातील काय स्थिती आहे, सीमावासियांच्या काय भावना आहेत याची पंतप्रधानांनीही माहिती घेतली. मागील आठवड्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होऊनसुद्धा खालच्या स्तरावर वक्तव्ये केली जात आहेत.

तसेच कर्नाटकच्या विधानसभेत त्याची वाच्चता झाली हे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. या वक्तव्याने सीमावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना आपण द्याव्यात, जेणेकरून सीमावासियांवर कोणतेही दडपण येऊ नये, अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली असल्याची माहिती खासदार मानेंनी दिली.