औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले.
इम्तियाज जलील यांनी ही माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोविड टेस्ट घ्या असे सुचवलले आहे.ही माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना सूचना केल्या होत्या की वीना मास्क बाहेर फिरू नका. अन्यथा लॉकडाऊन लावण्याचा पर्याय असेल. म्हणून सर्वांनीच इम्तियाज जलील सारख्या व्हीआयपी पासून धडा घेत स्वतःचा बचाव आणि संरक्षण केले पाहिजे. अन्यथा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.