…असे राज ठाकरे अनेकवेळा येतील अन जातील, पण…; शिवसेना नेत्याने पुन्हा डिवचलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार तसेच औरंगाबादमध्येही सभा घेणार, अशा दोन घोषणा केल्या. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर आता शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा गाजवून इतिहास निर्माण केला आहे. असा इतिहास कोणाकडूनही निर्माण होणे शक्य नाही. असे कितीही राज ठाकरे आले गेले तरी त्याचा इथं काहीही परिणाम होणार नाही, असे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांकडूनही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान आज अंबादास दानवे यांनी शिवसेनेबाबत बोलताना म्हटले की, औरंगाबादच नव्हे तर मराठवाडा सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी अनेक सभा गाजवून इतिहास निर्माण केला आहे. असा इतिहास कोणाकडूनही निर्माण होणं शक्य नाही. त्यामुळे राज ठाकरेंसारखेंच्या सभा होतील आणि जातील पण त्यामुळे औरंगाबादवर काहीही परिणाम होणार नाही.

आजही अयोध्येतल्या गल्ली गल्लीत शिवसेनेचीच चर्चा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी अयोध्येत जाण्याची घोषणा केली. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा अनेक लोकांनी हात वर केले होते त्यात भाजपही होता. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान असेल. आजही अयोध्येतल्या गल्ली गल्लीत याची चर्चा होते, असेही यावेळी दानवे यावेळी सांगितले.

Leave a Comment