दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही…. पूनम महाजन यांची राहुल गांधीवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेतून भारत भ्रमण करत आहेत तसेच लोकांना भ्रमित करत आहेत अशी टीकादेखील खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी केली आहे. विलेपार्ले येथे भारतीय जनता पार्टीतर्फे जागर मुंबईचा या मोहिमेअंतर्गत सभेत पूनम महाजन (poonam mahajan) बोलत होत्या. या सभेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार पूनम महाजन तसेच आमदार पराग अळवणी उपस्थित होते.

नेमक्या काय म्हणाल्या पूनम महाजन?
स्वसमृद्धीसाठी राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. ही तीच काँग्रेसची सत्ता आहे, 2007 मध्ये जेव्हा एएसआयने अभ्यास करून सुप्रीम कोर्टात रामसेतू हा ऐतिहासिक आहे, असा अहवाल दिला होता. त्याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या सत्तेने, युपीएने तो अहवाल परत घेतला होता. राम-रामायण मनघडंत आहे… आता निवडणुका आल्या की त्यांना राम आठवतो.. जिन को राम याद आता है.. वो विदेश मे आराम करता है… त्यांना फक्त हाच राम माहिती आहे, अशी टीका पूनम महाजन (poonam mahajan) यांनी यावेळी केली.

राहुल गांधी यांनी नेहमीच आईच्या मागे उभं राहून राजकारण केलं आहे. आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहून राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरु आहे, कुठे आहे तुमचा पुरुषार्थ? असा सवालदेखील पूनम महाजन (poonam mahajan) यांनी यावेळी केला. तसेच तुम्हाला तारक मेहता का उलटा चश्मा बघायची गरज नाही, इथंच राहुल गांधी यांचा उलटा दिमाग… पाहता येईल, असा टोमणादेखील पूनम महाजन यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या