स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 22 | नितिन बऱ्हाटे
“स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु शकते.
MPSC पुर्व 2019 ला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी क्वालिफाय होण्याची ‘तयारी’ उरलेल्या दिवसात करता येऊ शकते हा आत्मविश्वास तुमच्यात हवा. सदर लेखात आपण एक आठवडा पुर्वीचे नियोजन पाहु.
१) सर्वप्रथम पुर्व परिक्षेचे हाॅल टिकीट डाउनलोड करून प्रींट करुन घ्या. परिक्षा केंद्र तपासुन घ्या, तुमच्या ठिकाणापासून चे अंतर, कसे जाणार आहात(बस,बाईक), कोणासोबत जाणार आहात ते निश्र्चित करुन घ्या. न्यायची बॅग, आधारकार्ड (अनलाॅक) ची फोटो काॅपी यांची तयारी, पेन,पेन्सिल इत्यादी ची तयारी करुन ठेवावी. ऐनवेळी धावपळ नको.
२) “पुढील संपुर्ण आठवडा मागील दोन वर्षांच्या अभ्यासाचे 2 तासांत उपयोजन कसे करायचे यासाठी वापरा.” आठवडाभर आधीपासून दररोज वेळ(10-12 & 3-5) लावुन पेपर 1 & 2 सोडविल्यास दोन तासांच्या नियोजनाची परिणामकारक तयारी प्रत्यक्ष परिक्षेसाठी होईल.
संपुर्ण दिवस सहा सत्रामध्ये विभागुन घेता येईल.
उदाहरणार्थ.
सकाळी ६.३०-९.३० – GS-1 घटकांची उजळणी
१०-१२ – GS1 प्रश्नपत्रिका सोडविणे
१२-०१ – विश्लेषण
३-५ – CSAT प्रश्नपत्रिका सोडविणे
५.३० – ८.००– विश्लेषण आणि बुध्दिमत्ता चाचणी, गणित, उतारे सराव
९.३०- १०.३० – चालु घडामोडी उजळणी, अभ्यास आणि स्वतःचे आकलन, नियोजन, विचारमंथन इ.
३) सकाळचे 3 तास GS एका विषयाची जलद उजळणी करण्यासाठी ठेवा.
सामान्य अध्ययन 1 –
प्रत्येक विषयाच्या शार्ट नोट्सची उजळणी करा, विसरणार्या संकल्पना आणि तथ्यात्मक बाबी नजरेखालून घाला.
उदाहरणार्थ राज्यशास्त्रातील कलमे,कायदे घटनादुरुस्ती, भुगोलाचे नकाशे, विज्ञानाचे गणित, शास्त्रीय नावे, तक्ते, , इतिहासातील बाबी, अर्थशास्त्र निर्देशांक, तुम्ही तयार केलेल्या शार्टट्रिक्स इत्यादी प्रकारचा विसरणारा भाग उजळणी करून घ्या.
आयोगचे 2013 पासुन 2018 पर्यंतंचे पेपर वेळ लावुन सोडविण्यास प्राधान्यक्रम द्यावा, ज्यातुन प्रश्न विचारण्याची पद्धती, आपल्याला सवयी, पेपर हाताळण्याचे कौशल्य, अचुक उत्तरापर्यंत पोहचणे इत्यादी गोष्टी लक्षात येतील.
४) मागील दोन वर्षीच्या पेपर मध्ये विज्ञान विषयातील गणितं विचारली होती त्या गणिताचा सराव करुन घ्यावा, तसेच चालु घडामोडी मधील चर्चेतील व्यक्ती, पुरस्कार, योजना, घटना इत्यादी घटकांची उजळणी करुन घ्यावी.
५) या आठवड्यामध्ये महत्वाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही केलेल्या Imp मार्किंग, अधोरेखित, शार्ट नोट्स, आकृत्या, नकाशे नजरेखालून घालता येतील. तसेच महत्तवाच्या संदर्भ ग्रंथामधील रेडी रेफरन्स डेटा, सारांश/समरी, आपण काय शिकलो, व्हाट वी लर्न, डु यु नो.?(NCERTS), एकनाथ पाटील वनलाईनर, तक्ते इत्यादी गोष्टी वाचुन घेता येतील.
६) CAST – 2013 ते 2018 च्या प्रश्नपत्रिका 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत सोडवा, त्यातील प्रश्नांचे प्रकार मूळ पुस्तकांतुन सराव करा. गणिताचे जे प्रकार विचारले जातात त्यांचा सराव करा, विविध सुत्रे, पद्धती लक्षात घ्या, आयोगाने विचारलेले उतारे आणि त्यांचे प्रश्न यातील क्लुप्त्या शोधण्याचा प्रयत्न करा, पेपर सोडविण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचुक उत्तर येण्यासाठी विविध प्रयोग पडताळुन पहा. सीसॅटचे सर्व प्रकारासाठी आत्मविश्वासाने तयार रहा.
७) खाजगी क्लासेसच्या नमुना प्रश्नपत्रिकांच्या प्रश्न स्तर, प्रकार, गुणांचा तुमच्या मानसिकतेवर काही एक फरक पडु देऊ नका. सर्वांचे सर्वच घटक कधीच पुर्ण होत नाहीत त्यामुळे जेवढा अभ्यास झालाय त्यावर विश्वास ठेवा. सराव चाचणी मधील गुणांवरुन अभ्यासाचा अंदाज लावता येणार नाही. आयोगाचे प्रश्र्न आणि क्लासेच्या प्रश्नपत्रिकांचे प्रश्न यांचा स्तर बर्याचदा भिन्न असतात.
८) आता वाचलेलं आणि परिक्षेला विचारले जाणारे प्रश्र्न यांत भली मोठी तफावत असणार आहे, प्रश्र्न समोर आल्यावर तुम्हाला कळेल की मागच्या आठवड्यात वाचलेलं काहीच पेपर मध्ये नसुन आतापर्यंत केलेल्या संपुर्ण अभ्यासाचे आकलन आणि सदसद्विवेकबुद्धी याआधारे सुटणारे प्रश्र्न असतील. त्यामुळे उरलेल्या आठवड्यात तशी मानसिकता तयार करणे अपेक्षित आहे.
९) मागील 1-2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुर्व परिक्षेची परिक्षा जवळ आल्यानंतर भीती वाटणं, चिंता करणं किंवा नर्व्हस होणे स्वाभाविक आहे, नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करा. पेपरच्या प्रश्र्नांबद्दल आतुरता असली तरी संय्यम ठेवा.
१०) पुढील पुर्ण आठवडा शांत राहण्याचा प्रयत्न करा, कोणाशीही वाद-विवाद घालत बसु नका उलट स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. दररोज सात-आठ तास पुरेशी झोप घ्या, जंक फुड टाळा,आहार संतुलित ठेवा.
पुर्व परिक्षा तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे, तुमचे सर्वात्तम द्या, अभ्यास झालाय…,??मी उत्तीर्ण होईल का…? यावर्षी प्रिलिमच नाही निघाली तर…?? अशा नकारात्मक प्रश्नांनी अस्वस्थ होऊ नका 17 फेब्रुवारी च्या 5 वाजेपर्यंत give up करु नका, पुढील एक आठवडा तुमची स्वतःची रणनीती तयार असेल तर ती वापरा, नाहीतर वरील प्रमाणे नियोजन करा, अट्टाहास फक्त पुर्व परिक्षा उत्तीर्ण व्हावी हाच आहे.
#बाकी_How is Josh….??
नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)
तुम्ही MPSC चा अभ्यास करत असाल तर खालील लेख वाचायला अजिबात विसरू नका.
खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ
राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?
“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”
MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा
“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”
इतर महत्वाचे –
भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख
भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
भाग 3 – स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट
भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???
भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???
भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण
भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018
भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018
“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?
Next article on next Friday – “MPSC पुर्व 2019…परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….??”