रेल्वे स्थानकावर MRP पेक्षा जास्त शुल्क आकारले गेले तर डायल करा ‘हा’ क्रमांक, Railway करेल तात्काळ कारवाई

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी आणि इतर वस्तूंची MRP पेक्षा जास्त किंमतींमध्ये विक्री करता येत नाही. मात्र, असे असले तरीही काही रेल्वे स्थानकांमधील आणि गाड्यांमधील विक्रेते या नियमाची पायमल्ली करताना दिसून येतात. अनेकदा 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना विकली जाते. तसेच चहासाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 2 ते 3 रुपये जास्त आकारले जातात. मात्र आता याबाबत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण जर कोणी रेल्वे प्रवासादरम्यान आपल्याकडून एमआरपीपेक्षा जास्त शुल्क आकारले तर ट्रेनमध्ये बसल्या जागी आपल्याला रेल्वेकडे याबाबत तक्रार दाखल करता येईल. अशा प्रकारच्या बेकायदेशीर वसुलीच्या तक्रारींसाठी रेल्वे तक्रार हेल्पलाइन क्रमांक 139, Rail Madad App आणि रेल्वे वेबसाइटद्वारे तक्रार करता येईल.

Central railway to work on hygiene and quality of food served at station  stalls

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार प्लॅटफॉर्मवरून ट्रेनपर्यंत धावणारे विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने चहा-पाणी विकून रेल्वे प्रवाशांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. हे थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालया कडून प्रयत्न केले जात आहेत. मंत्रालयानेही नो बिल, नो पेमेंटचे पॉलिसी सुरू केली आहे. मात्र, रेल्वे प्रवाशांमध्ये जागृतीचा अभाव आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अशा प्रकारे करण्यात येणारी अवैध वसुली थांबण्याचे नाव घेईना. Railway

LPG banned, passengers get cold food at platforms

सेव्ह करा हे नंबर

ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर जास्त पैसे देऊन वस्तू खरेदी करताना थोडी काळजी घेतल्यास अशा प्रकारचा आर्थिक छळ टाळता येईल.जर आपल्यासोबत असे घडल्यास रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक 139 वर तक्रार करा. हा नंबर डायल केल्यानंतर, तक्रारीच्या स्वरूपानुसार भाषा निवडण्यास आणि कोणताही एक नंबर दाबण्यास सांगितले जाईल. तसेच तक्रार करण्यासाठी आपला पीएनआर क्रमांक विचारला जाईल. त्याच प्रमाणे आपल्याला कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशी देखील बोलता येईल. 1800111139 या टोल फ्री क्रमांकावरही अशी तक्रार दाखल करता येईल. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसएमएसचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी प्रवाशाने 9717630982 वर मेसेज करावा. Railway

ओवर चार्जिंग रोकने को नो बिल, नो पेमेंट की नीति भी शुरू की है. (Photo : shutterstock)

अशा प्रकारे दाखल करा ऑनलाइन तक्रार

एमआरपीपेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याबद्दल प्रवाशांना ऑनलाइन तक्रारही दाखल करता येईल. हे काम App आणि वेबसाइट या दोन्हींवरून करता येईल. यासाठी प्रवाशांना http://www.coms.indianrailways.gov.in वर जाऊन App डाउनलोड करावे लागेल. त्याचप्रमाणे, प्रवासी त्यांच्या तक्रारी http://www.coms.indianrailways.gov.in/ या वेबपेजवरही नोंदवू शकतात. तक्रार नोंदवल्यानंतर तक्रार क्रमांक मिळेल. ज्याचा वापर करून त्याचे स्टेट्स कळेल. Railway

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ