हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : एशियन पेंट्स लिमिटेड ही एक भारतीय मल्टी-नॅशनल कंपनी आहे. आशियातील चौथी सर्वात मोठी पेंट कंपनी असलेल्या एशियन पेंट्सची मार्केटकॅप 3.28 लाख कोटी रुपये आहे. गेल्या दोन दशकांत फक्त काही हजारांच्या गुंतवणुकीद्वारे या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहेत. 1999 पासून आतापर्यंत एशियन पेंट्सच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 290 पट वाढ झाली आहे.
NSE वर 13 सप्टेंबर रोजी हे शेअर्स 1.36 टक्क्यांनी वाढून 4,364.00 रुपयांवर बंद झाले. मात्र, सुमारे 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी, एशियन पेंट्सच्या शेअर्सची किंमत फक्त 11.88 रुपये होती. अशा प्रकारे या शेअर्सच्या किंमतीत 28,721.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्याने 23 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2.88 कोटी रुपये झाले असते. तसेच दुसरीकडे, जर एखाद्याने 1 जानेवारी 1999 रोजी यामध्ये फक्त 35 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 35 हजार रुपयांचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
गेल्या 5 वर्षात दिला 174.91 टक्के रिटर्न
एशियन पेंट्सचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 2.20 टक्क्यांनी घसरले आहेत तर गेल्या 6 महिन्यांत यामध्ये फक्त 1.83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 5 वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 174.91 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे 2.74 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock
कंपनीचे आर्थिक आरोग्य
एशियन पेंट्सचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा वार्षिक आधारे 80.4 टक्क्यांनी वाढून FY2023 च्या जून तिमाहीत 1,036 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 574.30 कोटी रुपये होता. त्याच वेळी, कंपनीची कंसोलिडेटेड कमाई ई-जून तिमाहीत 54 टक्क्यांनी वाढून 8,607 कोटी रुपये झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,585.36 कोटी रुपये होती.
ऑपरेटिंग आघाडीवर, कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2023 च्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर 88.65 टक्क्यांनी वाढून 913.56 कोटी रुपये झाला आहे, तर कंपनीचे मार्जिन मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीच्या तुलनेत 194 bps ने वाढून 10.61 टक्के झाले आहे. Multibagger Stock
कंपनीविषयी जाणून घ्या
भारतीय पेंट उद्योगातील मोठी कंपनी असलेल्या एशियन पेंट्सचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे. याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. कंपनीकडून पेंट, होम डेकोर, फिटिंगशी संबंधित प्रॉडक्ट्स आणि संबंधित सेवा, उत्पादन, विक्री आणि वितरण केले जाते. हे लक्षात घ्या कि, एशियन पेंट्स आज जगातील टॉप 10 सजावटीच्या कोटिंग कंपन्यांपैकी एक आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.asianpaints.com/
हे पण वाचा :
Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा
Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश
Airtel च्या 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 2GB डेटा
LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ