हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात अशा काही मोजक्याच कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या काही वर्षामध्ये आपल्याला भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज आपण अशाच एका कंपनीबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण SEL Manufacturing Company Ltd या टेक्सटाइल कंपनीबाबत चर्चा करणार आहोत. या कंपनीच्या शेअर्सची फक्त 5 वर्षातच 28,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. Multibagger Stock
गेल्या 5 वर्षात 28,013.21 टक्क्यांनी वाढ
हे लक्षात घ्या कि, NSE वर 14 सप्टेंबर रोजी SEL Manufacturing Company Ltd च्या शेअर्सची क्लोझिंग प्राईस 745.00 रुपये होती. मात्र, NSE वर 5 वर्षांपूर्वी त्याची किंमत फक्त 2.65 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 5 वर्षांत याच्या किमतीत सुमारे 28,013.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2.81 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
गेल्या एका वर्षात सुमारे 14,950.51 टक्के रिटर्न
एक वर्षापूर्वी 28 ऑक्टोबर 2021 रोजी या शेअर्सची किंमत सुमारे 4.95 रुपये होती आणि तेव्हापासून त्यामध्ये 14,950.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर एखाद्याने यादरम्यान या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1.50 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
स्मॉल कॅप कंपनी असलेल्या SEL Manufacturing Company Ltd ची मार्केट कॅप 2.47 हजार कोटी रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत यामध्ये सुमारे 55.10 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 9.10 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.selindia.in/
हे पण वाचा :
PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा
Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, नवीन दर पहा
IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा
Vivo V25 5G : 50MP सेल्फी कॅमेराचा दमदार मोबाईल लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये