Thursday, October 6, 2022

Buy now

काँग्रेसमुळेच मोदी 2 वेळा पंतप्रधान झाले- ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी हे मुस्लिमांमुळे नव्हे तर काँग्रेसमुळे दोन वेळा पंतप्रधान झाले असं मोठं विधान MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी राजस्थान मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर लोकांना संभोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवरही निशाणा साधला.

ओवेसी म्हणाले, मुस्लिमांमुळे मोदी दोनदा देशाचे पंतप्रधान झाले नाहीत, तर काँग्रेसमुळे ते दोनवेळा पंतप्रधान झाले आहेत. भाजपची वाटचाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर आहे, त्यामुळे आपल्याला तिसरी शक्ती ओळखावी लागेल असे ते म्हणाले. करौलीत दंगल झाली, पण राज्याचे मुख्यमंत्री गेले नाहीत, असे म्हणत त्यांच्या राज्य दौऱ्यावर काँग्रेस इतकी का घाबरली आहे असा सवाल ओवेसींनी केला.

काँग्रेस पक्ष राजस्थानमध्ये सर्कसचा देखावा सादर करत आहे. मुख्यमंत्र्यांचे एक सल्लागार आणि एक आमदार सांगतात की, राजस्थानात दोनच घोषणा देता येतील. एक राजीव गांधी आणि दुसरी अशोक गेहलोत यांची . राजस्थानमध्ये गेहलोत मुर्दाबाद बोलणे गुन्हा असेल तर मी म्हणतो, अशोक गेहलोत मुर्दाबाद . जर आम्ही मोदी मुर्दाबाद बोलू शकतो तर गेहलोत मुर्दाबादही बोलू शकतो असेही ओवेसींनी म्हंटल.