हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. मल्टीबॅगर स्टॉक्स हे अनेकदा गुंतवणूकदारांचे नशीब बदलवतात. मात्र अस्थिर आणि जोखमीचे मानल्या जाणाऱ्या शेअर मार्केटमध्ये कधी कोणता शेअर्स मोठा नफा मिळवून देईल हे सांगता येणार नाही. असेच काहीसे CAPLIN POINT LAB च्या शेअर्सने घडवले आहे… इथे हे जाणून घ्या कि, या शेअर्समध्ये फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे.
गेल्या 20 वर्षांत दिला 2900 पट रिटर्न
21 फेब्रुवारी 2003 रोजी फक्त 25 पैसे किंमत असलेले हे शेअर्स आता 726 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. अशा प्रकारे गेल्या 20 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 2900 पट रिटर्न दिला आहे. अशा स्थितीत जर एखाद्याने दोन दशकांपूर्वी यामध्ये फक्त 3500 रुपयांची जरी गुंतवणूक केली असती, आता त्याचे 1 कोटी रुपये असते. Multibagger Stock
कंपनीच्या सध्याच्या कामगिरीबाबत जाणून घ्या
दीर्घकालावधीमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांसाठी या कंपनीचे शेअर्स फायदेशीर ठरले आहेत. 2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. तसेच 6 जानेवारी 2022 रोजी त्याची किंमत 888.45 रुपये या वर्षीच्या उच्चांकावर पोहोचली होती. मात्र, सध्या या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मे 2022 मध्ये, हे शेअर्स 600 रुपयांवर आले होते. आता तो पुन्हा 726 रुपयांच्या पातळीवर आला आहे. Multibagger Stock
शेअर्सच्या गेल्या पाच वर्षातील चढ-उतारावर एक कटाक्ष
या शेअर्सच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीकडे पाहिल्यास यामध्ये अनेकदा चढ-उतार दिसून आले आहेत. 22 डिसेंबर 2017 रोजी हे शेअर्स 638.25 रुपयांच्या पातळीवर होते. 28 डिसेंबर 2018 रोजी ते 382 रुपयांपर्यंत खाली आले होते. यानंतर 20 डिसेंबर 2019 रोजी 313.20 रुपयांवर घसरला… आणि 20 मार्च 2022 रोजी त्याची किंमत फक्त 238 रुपये होती. यानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. तसेच 9 सप्टेंबर 2021 रोजी ते 934 रुपयांपर्यंत खाली आले. Multibagger Stock
फार्मा कंपनीबाबत जाणून घ्या
कॅपलिन पॉइंट लॅब ही एक फुल्ली इंटीग्रेटेड फार्मा कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय अनेक आफ्रिकन देशांमध्ये पसरलेला आहे. तसेच ही कंपनी Ointments, Cream बनवते. 1990 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. 1994 मध्ये भारतीय शेअर बाजारात या कंपनीची लिस्टिंग झाली. त्यावेळी या IPO ला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/caplin-point-laboratories-ltd/cappl/524742/
हे पण वाचा :
Vivo T1 44W : फक्त 2,250 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
Platform Ticket म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या