हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र, इतर बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार मजबूत स्थितीत आहे. रिअल इस्टेट क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर कोरोना काळापासून हे क्षेत्र प्रचंड दबावाखाली आहे. मात्र, असे असूनही या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. नॅशनल स्टँडर्ड इंडिया लिमिटेडचे शेअर्स शेअर देखील याच कॅटेगिरीमध्ये येतात. गेल्या 4 वर्षातच या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा दिला आहे.
हे लक्षात घ्या कि, BSE वर मंगळवारी (25 ऑक्टोबर रोजी) नॅशनल स्टँडर्ड इंडियाचे शेअर्स 4,966.45 रुपयांवर बंद झाले. 3 जून 2018 रोजी BSE वर त्याची किंमत फक्त 21.90 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 4 वर्षांत, या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 22,577.85 टक्के मजबूत नफा मिळवून दिला आहे. Multibagger Stock
एका महिन्यात 10 टक्क्यांची वाढ
एका मीडिया रिपोर्टसनुसार, नॅशनल स्टँडर्ड इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 2.40 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचप्रमाणे, 2022 च्या सुरुवातीपासून त्याचे शेअर्स सुमारे 47 टक्क्यांनी खाली आले आहेत. नॅशनल स्टँडर्ड इंडियाची मार्केट कॅप 9.93 हजार कोटी आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने 4 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य सुमारे 2.26 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्याने त्या वेळी या शेअर्समध्ये फक्त 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आज 1.12 कोटी रुपये मिळाले असते. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, ऑगस्ट 1962 मध्ये नॅशनल स्टँडर्डची स्थापना झाली आहे. यापूर्वी त्याचे नाव नॅशनल स्टँडर्ड डंकन लिमिटेड असे होते. मे 2011 मध्ये लोढा ग्रुपने ते विकत घेतले होते. तेव्हापासून हा लोढा ग्रुपचा एक भाग बनला आहे. ही कंपनी उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांना लक्षात घेऊन निवासी प्रकल्प बनवते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/national-standard-(india)-ltd/nationstd/504882/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा