गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र, इतर बाजारांच्या तुलनेत सध्या भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात अशा कंपन्यांचे शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत.

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely - BusinessToday

हे लक्षात घ्या कि, गेली दोन दशके अनेक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर नफा मिळवून देणारी ठरली आहेत. बालाजी अमाईन्स या स्पेशल केमिकल बनवणाऱ्या कंपनीने देखील गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अवघ्या दहा हजार रुपयांची गुंतवणुक करणाऱ्यांना या शेअर्सने कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. दीर्घ कालावधीबरोबरच बालाजी अमाईन्सच्या शेअर्सने अल्पावधीतही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या अडीच वर्षांत या शेअर्सने 1150 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. Multibagger Stock

Multibagger Stock: ఏడాదిలో మీ డబ్బును డబుల్ చేసిన స్టాక్ ఇదే...

गुंतवणूकदार झाले मालामाल

हे लक्षात घ्या कि, BSE वर 28 ऑक्टोबर रोजी बालाजी अमाईन्सचे शेअर्स 1.15 टक्क्यांनी वाढून 3013.80 रुपयांवर बंद झाले आहेत. मात्र, सध्या बालाजी अमाईन्सचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच बाजारातील तज्ज्ञ देखील या शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार असल्याचे मत व्यक्त करत आहेत. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, KR Choksey ने यासाठी 4313 रुपयांचे टार्गेट दिले आहे. तसेच यामध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा 43 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होणे शक्य असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. Multibagger Stock

2002 मध्ये 2.63 रुपये किंमत असलेले बालाजी अमाईन्सचे शेअर्स आता 3013.80 रुपयांच्या पातळीवर आहेत. तसेच गेल्या 20 वर्षात या शेअर्सने 1,14,225 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने त्या वेळी यामध्ये फक्त 9 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य एक कोटी रुपये झाले असते. या वर्षी 4 जानेवारी 2022 रोजी बालाजी अमाईन्सच्या शेअर्सने 3,936.95 रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, आता शेअर्सची सध्याची किंमत 3013.80 रुपये झाली आहे म्हणजेच त्याच्या उच्चांकावरून हा स्टॉक आता सवलतीमध्ये मिळत आहे. Multibagger Stock

Multibagger Stocks For 2022 Hemang Resources Share Price 1 Lakh Turns Into 13 Lakh | Multibagger Stock: इस कंपनी के शेयर ने 1 लाख को बना दिया 13 लाख, सिर्फ 6 महीने में दिया 866 फीसदी रिटर्न

पुढे वाटचाल कशी राहील ???

KR Choksey च्या विश्लेषकांच्या मते, बालाजी अमाईन्सने आवश्यक उत्पादनांच्या आयातीवर आणि कमी स्पर्धा असलेल्या उत्पादनांच्या धोरणात्मक प्लॅनिंगमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे आगामी काळात यामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळेच बाजारातील तज्ज्ञांनी यामध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/balaji-amines-ltd/balamines/530999/

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा