१३० वर्षात प्रथमच मुंबईच्या डब्बेवाल्यांनी १० दिवस सेवा ठेवली बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, मुंबईच्या चाकरमान्यांना घरचे जेवण पुरवणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांनी २० मार्चपासून ३१ मार्चपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या १३० वर्षाच्या अविरत सेवेत प्रथमच सलग १० दिवस मुंबई डब्बेवाल्यांच्या संघटनेने करोना विषाणूचा धोका लक्षात घेत आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत १८९० साली डब्बेवाल्यांनी लोकांना त्यांच्या घरचे जेवण त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्याच्या सेवेला सुरवात केली होती. त्या काळातील काही इंग्रजी आणि फारशी लोकांची गरज लक्षात घेऊन या सेवेला सुरुवात झाली होती. आज मुंबईत लोकल ट्रेननंतर मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा जीवनरेखा बनली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment