ड्रग पार्टीतील ‘त्या’ तिघांना एनसीबीने का सोडलं; मलिकांनी उघड केले भाजप कनेक्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. असा आरोप त्यांनी केला. तसेच यावेळी पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत.

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. मात्र भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय.

अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केलीय. दिल्लीपासून महाराष्ट्रातील वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी त्यांना सोडण्यासाठी फोन केले आणि त्यामुळे एनसीबीने त्यांना सोडलं आहे, असं म्हणत ही छापेमारी पूर्णपणे बोगस आहे अस नवाब मलिक यांनी म्हंटल.

जर 1300 लोकं त्या क्रुझवर होते तर केवळ सिलेक्टेड आठ लोकांनाच का पकडलं, असा सवालही मलिक यांनी केला. ही सर्व कहाणी जाणूनबुझुन रचलेली आहे, असंही ते म्हणाले. ही संपूर्ण कारवाई एक षडयंत्र आहे. या सर्व प्रकारात भाजपचे लोक सहभागी होते, म्हणून भाजपच्या संबंधित लोकांना सोडून देण्यात आलं, असं ते म्हणाले.

Leave a Comment