Mumbai Goa Highway | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अवजड वाहणांसाठी हा मार्ग म्हणजे जणू काही मालवाहतुकीसाठी निर्माण केलेला मार्गच. मात्र आज या अवजड वाहणांना या राष्ट्रीय महामार्गावरून जाण्यास बंदी घातली आहे. या बंदिमुळे या वाहणांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले आहे. अशी माहिती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी परिपत्रक काढून दिली आहे. आता हे पर्यायी मार्ग नेमके कोणते आहेत? याबाबत जाणून घेऊयात.
का घालण्यात आली बंदी?
पाली वाकण मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे. कारण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार हे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यात लोणार येथे येणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील 75 हजार नागरिक येणार आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी येथे होऊ शकते. त्या कारणाने या महामार्गावरील अवजड वाहणांना बंदी घालण्यात आली आहे. आज सकाळी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai Goa Highway) जड वाहनांना वाहतूकीस परवानगी नसेल. परंतु दूध, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन आणि भाजीपाला यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्यास परवानगी असेल.
कोणते आहेत पर्यायी मार्ग? Mumbai Goa Highway
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी परिपत्रक काढत ही बंदी घातली आहे. या अवजड वाहणांना घातलेल्या बंदिमुळे मुंबई गोवा हायवे वर (Mumbai Goa Highway) नेमका पर्यायी मार्ग कोणता? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासाठी या वाहणांना मोरबे मार्गावर वळण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी 8 ते 12 पर्यंत तसेच दुपारी 3 ते 10 या कालावधीत गोवा मार्गे येणारी ही वाहने मोरबे मार्गे वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवस ही वाहतूक इतर मार्गाने केली जाणार आहे.