हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा वरून ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे यासाठी एक चांगला मार्ग हवा म्हणून मुंबई – गोवा मार्ग निर्माण करण्यात येत आहे. परंतु तब्बल 12 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. खराब रस्त्यामुळे सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात त्यामुळे अतिशय महत्वाचा असणारा हा महामार्ग नेमका पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न मुंबई आणि कोकणवासीयांना पडत आहे. मात्र आता मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याबाबत माहिती समोर आली आहे.
31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल मार्ग- Mumbai Goa Highway
जवळपास 12 वर्षानंतर मुंबई ते गोवा मार्गाकडे (Mumbai Goa Highway) लक्ष देण्यासाठी सरकारला फुरसत मिळाली आहे. या मार्गाच्या चौपद्रिकरणाचे आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी सरकारने सांगितले की, हे काम पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वेळ लागणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा जनतेला आहे.
न्यायालयाने दिली सरकारला ताकीद
मुंबई – गोवा मार्गाचे (Mumbai Goa Highway) काम पूर्ण न झाल्यामुळे या मार्गासाठी उच्च न्यायलायाने दोनवेळा मुदत वाढ दिली होती. मात्र तरीही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मार्गाच्या दुरुस्तीचे व रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि एनएचआयला न्यायालयानं ताकिद दिली असून हे काम यावेळी पूर्ण न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा दिला आहे. बुधवारी यावर सुनावणी करण्यात आली. हे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीस वेग येणार आहे. तसेच वाहतूक सुविधेसही गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता हा मार्ग नेमका कधी निर्माण होऊन सेवेत रुजू होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.