हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. आणि त्यात सणासुदीचे दिवस सूरु असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड वाढत आहे. सध्या सणाच्या निमित्त अनेक चाकरमानी आणि कर्मचारी वर्ग गावाला जाण्यासाठी आतुरला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Goa Vande Bharat) आठवड्यातून ३ दिवस धावत होती, मात्र आता हीच वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचला जाईल. आणि प्रवासही सुखकर होईल.आज आपण या ट्रेनचे नवे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स वरून ही ट्रेन सुरु होईल आणि गोव्यातील मडगाव याठिकाणी थांबेल. या CSMT- मडगाव- CSMT वंदे भारत मार्गासाठी शुक्रवार वगळता इतर सर्व दिवशी सुरु राहील. ही वंदे भारत ट्रेन 586 किमी अंतर केवळ ८ तासांत पूर्ण करते. ह्या ट्रेनचा वेग इथे धावणाऱ्या इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक गतिशील आहे.
कसे असेल वेळापत्रक? Mumbai Goa Vande Bharat
सणासुदीचे दिवस असल्यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकात सतत बदल होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आता दिवाळी जवळ आल्यामुळे येणाऱ्या 1 नोव्हेंबरला ट्रेनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. वंदे भारतचे सध्याचे वेळापत्रकात हे असे की, मुंबईतून ही गाडी सकाळी 5:35 ला CSMT वरून निघते. त्यानंतर ती मडगावला दुपारी 1:15 ला पोहचते. येथे थोडावेळ थांबून ती 2:35 ला येथून सुटून पुन्हा ती 10:25 ला CSMT येऊन पोहचते.
किती आहे तिकीट?
मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनचे (Mumbai Goa Vande Bharat) तिकीट हे सामान्य माणसाला परवडेल असे आहे. त्यामध्ये सी कोचचे भाडे 1100 ते 1600 रुपये एवढे आहे. तसेच आता ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास डब्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे ह्याचे भाडे हे 2000 ते 2800 रुपये इतकं आहे.