मलिक- देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच; राष्ट्रवादीचे समीकरण बिघडणार??

malik deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 20 जूनला विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता आले नव्हते.

या दोन्ही नेत्यांवर गुरुवारी सुनावणी पार पडली होती. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. गुरूवारी झालेल्या सुनाणवीत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ईडी ने केला तर त्यांना मतदानाचा अधिकार नाकारणे म्हणजे त्यांना निवडून दिलेल्या मतदारांना अवमान असल्याची भूमिका त्यांच्या वकिलांनी मांडली होती.अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार जोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानाचा हक्क नाकारला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.

विधानपरिषदेच नेमकं गणित काय-

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडुन रामराजें निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे 2 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचा आमदारांची संख्या 53 आहे. त्यातील मलिक आणि देशमुखांची मते कमी झाल्यास संख्या राहते 51…. विधानसभेतील 288 पैकी 285 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठीचा कोटा आता 26 वर आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 26 मते हवी आहेत. राष्ट्रवादीला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज लागेल.