हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यात महिलांचे प्रमाण देखील तितकेच अफाट आहे. मात्र रेल्वे स्थानकावर महिलांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची कमतरता नेहमीच असते . स्थानकांमध्ये अस्वच्छ असलेली स्वच्छतागृहे यामुळे महिलांना अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागते . स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने ४८ टक्के महिला असमाधानी आहेत. परंतु मध्य रेल्वेने महिलांच्या सोयीसाठी आधुनिक पद्धतीच्या स्वच्छतागृहाबरोबरच स्थानकात सौंदर्य प्रसाधने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तमाम महिलावर्गासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
2 महिन्यात उभारले जाणार सौंदर्य प्रसाधने
मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयाअंतर्गत पुढील दोन महिन्यामध्ये रेल्वे स्थानकात सौंदर्य प्रसाधने उभारली जातील. सौंदर्य प्रसाधनाच्या माध्यमातून महिलांना स्वच्छ स्वच्छतागृहे, लहान मुलांच्या स्तनपाणासाठी व मुलांचे डायपर बदलण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर सौंदर्य साहित्याचे विक्री दालन देखील उपलब्ध असेल. महिलांना बसण्यासाठी व वेळ घालवण्यासाठी कॉफी शॉप देखील सुरु केलं जाईल. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी एकाच छताखाली महिलांना उपलब्ध करून दिल्या जातील.
तब्बल 7 स्थानकात बांधली जाणार सौंदर्य प्रसाधने- Mumbai Local
मध्य रेल्वेच्या स्थानकात (Mumbai Local) सौंदर्य प्रसाधनासाठी 200 चौरस फुटाची जागा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या अंतर्गत ही सौदंर्य प्रसाधने बनवली जातील. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराला पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सौंदर्य प्रसाधनाचे कंत्राट दिले जाईल. ज्याअंतर्गत संबंधित कंत्राटदाराने पुढील दोन महिन्यात सौंदर्य प्रसाधनाचे काम पुर्ण करावे लागेल. मध्य रेल्वे सध्या सात रेल्वे स्थानकात सौन्दर्यप्रसाधने बांधणार आहे. ज्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (फलाट क्रमांक एकजवळ), कांजूरमार्ग (फलाट क्रमांक वन-ए), मुलुंड (पश्चिम), मानखुर्द (फलाट क्रमांक एक), चेंबूर (फलाट क्रमांक एक) घाटकोपर (फलाट क्रमांक एक) आणि ठाणे (फलाट क्रमांक दोन) या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
घाटकोपर स्थानकात पूर्वीच उपलब्ध होती सुविधा
दरम्यान, घाटकोपर रेल्वे स्थानकात याआधीच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याच्या माध्यमातून महिलांना आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली गेली आहेत. रेल्वेने सुरु केलेल्या उपक्रमाबाबत महिला प्रवाश्यामधून समाधान व्यक्त केले गेले आहे . आता अन्य रेल्वे स्थानकात हा उपक्रम राबवला जाईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले .