हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम रेल्वे प्रवाश्यांचा सोयीसाठी नेहमीच तत्पर असते. पश्चिम रेल्वेकडून काही ना काही निर्णय हे सतत घेतले जातात. त्यामुळे नागरिकांच्या मागण्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो. आता असच काहीस झालं आहे. प्रवाश्यांनी केलेल्या मागणीनुसार पश्चिम रेल्वे आता AC लोकल वाढवण्याच्या तयारीस लागली आहे. एकीकडे मध्य रेल्वेने 10 लोकल फेऱ्या वाढवल्या असताना आता दुसरीकडे 17 AC लोकल फेऱ्या सूरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
17 AC लोकल फेऱ्या होणार सुरु
पश्चिम रेल्वेने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आता 17 लोकल फेऱ्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे याची संख्या 79 वरून 96 वर येऊन ठेपली आहे. प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. फेऱ्यांची संख्या तेवढीच राहणार असून साध्या लोकलच्या बदल्यात या फेऱ्या चालविण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्याची संख्या मात्र तेवढीच म्हणजेच 1394 इतकीच रहाणार आहे. या फेऱ्या सोमवार ते शुक्रवार चालवण्यात येणार आहेत. तर शनिवार आणि रविवार नॉन AC लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे.
चर्चगेट पर्यंत वाढवली जाणार सेवा
पश्चिम रेल्वेने सांगितले की, नागरिकांची संख्या प्रचंड मोठी होत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रवाश्यांना अधिकची सेवा देण्यासाठी गाडी क्रमांक DN93004/DN93007 डहाणू आणि अंधेरी पर्यंत धावणारी ट्रेन चर्चगेट पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय सेवाच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.
कोणत्या ठिकाणी धावेल ट्रेन:
नवीन 17 एसी लोकल फेऱ्या सुरु केल्यामुळे आता ह्या गाड्या कोणत्या ठिकाणी धावतील असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर नवीन सुरु होणारी AC लोकल फेऱ्यापैकी 9 या वरच्या दिशेने सुरु होणार असून 8 या खालच्या दिशेने सुरु होणार आहेत. म्हणजेच वरच्या साईडला – नालासोपारा, बोरिवली आणि भाईनदर – बोरिवली दरम्यान प्रत्येकी एक फेरी. विरार – चर्चगेट दरम्यान प्रत्येकी दोन फेऱ्या आणि बोरिवली – चर्चगेट दरम्यान चार फेऱ्या होणार आहेत. तर खालच्या साईडला म्हणजे चर्चगेट, भाईनदार, विरार आणि बोरिवली एक फेरी चर्चगेट-विरार आणि चर्चगेट- बोरीवली दरम्यान प्रत्येकी तीन फेऱ्या होणार आहेत. या ठिकाणी गाडीच्या फेऱ्या होतील.