हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local Train) नेहमी प्रवाश्यांसाठी काही ना काही हिताचे निर्णय घेत असते. त्यामुळे त्याचा नगरिकांना चांगलाच फायदा होतो. यातच रेल्वेने आता पट्री ओलांडून जाणाऱ्या लोकांना लगाम घालण्यासाठी ‘शून्य मृत्यू’ या मोहिमेअंतर्गत एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे पट्री ओलांडून जाणार्यांना आळा बसेल. प्रत्येकाला कामाला जाण्याची घाई असते. त्यासाठी अनेकजण रेल्वे स्थानकावर आल्यावर दुसऱ्या प्लॅटफॉर्म गाडी असल्यास फ्लॅयओव्हरवरून न जाता पट्री ओलांडून जातात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्याच थांबवण्यासाठी रेल्वेने एक रामबाण उपाय काढला आहे.
कोणती लढवली शक्कल?
रेल्वे स्थानकावर (Mumbai Local Train) आल्यावर प्रवासी पट्री ओलांडून जातात. त्यासाठी रेल्वेने फलटावर काही ठिकाणी काळ्या रंगाच्या ग्रीजने रंगवले जाणार आहे. यामुळे असे होईल की, जो कोणी प्रवासी पट्री ओलांडून जाण्याचा प्रयत्न करेल त्याचे पाय ग्रीज ने माखले जातील. एवढेच नव्हे तर या ग्रीजमुळे प्रवाश्यांचे कपडे देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे हा रामबाण उपाय चांगलाच फायद्याचा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
रेल्वेने दिल्या होत्या सूचना- Mumbai Local Train
रेल्वेतर्फे प्रवाश्यांना अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी त्यांनी रुळाजवळ भिंती, तारा बांधल्या होत्या. मात्र त्यासही प्रवाश्यांनी झिडकारले. वेळोवेळो सूचना देऊनही प्रवाश्यांनी या सूचना पाळल्या नाहीत. प्रवाश्यांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल लिफ्ट, सरकते जीने यासारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तरीसुद्धा प्रवासी त्याचा वापर न करता पट्री ओलांडून जातात. यामुळे अपघात होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यासाठी बेलापूर आणि दादर रेल्वे स्थानकात ही शक्कल लढवली आहे.