Mumbai Local Train : नवी मुंबईकरांना मिळाले दिवाळी गिफ्ट; खारकोपर ते उरण लोकल होणार सुरु

0
3
Mumbai Local Train Uran Kharkopar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Train | दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेकडून अनेक ठिकाणहून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईकरांना सुद्धा आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर खारकोपर ते उरण लोकल सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे.

खारकोपर ते उरण हा मार्ग सुरक्षित नसल्यामुळे या लोकलचे (Mumbai Local Train) काम थांबले होते. मात्र आता त्याबाबतीत रेल्वे आयुक्तांनी हा मार्ग सुरक्षित असल्याचे सांगितल्यामुळे येथील नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. रेल्वे बोर्डाने यावर मंजुरी दिली असून आता मध्य रेल्वेच्या अखत्यारीत या मार्गावरील ही लोकल सेवा धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे. उरण मध्ये सध्या शहरीकरण वाढत असल्यामुळे येथे रोजगाराची निर्मिती होत आहे. त्यासाठी अनेकजण तेथे जाण्यासाठी उत्सुक आहेत.

लोकलच्या वाढणार फेऱ्या- Mumbai Local Train

खारकोपर ते उरण या मार्गांवर लोकल सुरु होणार असल्यामुळे लोकलच्या फेऱ्या या वाढणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे. नेरुळ ते खारकोपर अश्या रूटवरून रोजच्या 20 फेऱ्या होतात. मात्र आता त्यात भर पडून या फेऱ्या 40 वर येऊन ठेपणार आहेत. त्यातल्या काही फेऱ्या या उरण पर्यंत चालवल्या जाणार आहेत.

उरण खारकोपर दरम्यानचे काम पूर्ण

नेरुळ ते उरण या मार्गांवर उरण – खारकोपर दरम्यानचे दुसऱ्या टप्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील कामाला गती प्राप्त झाली आहे. या मार्गीकेमुळे नवी मुंबई विमानतळ, उरण येथे राहणाऱ्या नागरिकांना लोकलने हार्बर मार्गावर येता येणार आहे. ही लोकल लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होणार आहे.