Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेवर धावणार 25 ते 30 अतिरिक्त लोकल; प्रवाशांना मिळाला सर्वात मोठा दिलासा

Mumbai Local Train Western Line
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local Train | पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. येथे नोकरी आणि व्यवसायासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने गर्दीही नेहमीच मोठी असते. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गीकेचे काम एप्रिल – मे अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवर आता अधिक 30 लोकल धावणार आहेत आणि चाकरमान्यांना याचा फ़ांद्या होणार आहे.

30 अतिरिक्त गाड्या चालवणे होणार शक्य- Mumbai Local Train

पश्चिम रेल्वेवर टाकल्या जात असलेल्या सहाव्या मार्गीकेमुळे येथे चर्चगेट- विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून दररोज 1394 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जात असल्या तरी वसई, विरार, डहाणूपासून लाखो प्रवसी दररोज आपल्या नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येत असतात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी होते. याकडे लक्ष देत रेल्वेने सहावी मार्गीका टाकली आहे. या निर्णयामुळे लोकलने (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

साडेसात किलोमीटरची टाकली जातीये मार्गीका

गोरेगाव – बोरिवली दरम्यान टाकली जात असलेल्या सहाव्या मार्गीकेमुळे लोकल प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे. ही मार्गीका एकूण साडेसात किलोमीटरची असणार आहे. चौथ्या आणि पाचव्या मार्गीकेवरून सध्या गाड्या चावल्या जात आहेत. त्यामुळे जेव्हा सहावी मार्गीका सुरु करण्यात येईल तेव्हा मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या पाच व सहाव्या मार्गीकेवरून चावल्या जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा प्रवाश्यांना होणार हे नक्की. तसेच यां लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या जेवढी प्रचंड आहे. त्यावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सहाव्या मार्गीकेचे काम झाल्यानंतर होणाऱ्या गर्दीला आळा घातला जाईल.