हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून निशाणा साधला. यावेळी प्रथम त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला देणाऱ्या चंद्रकांतदादांनी अमृता फडणवीसांना विरोधीपक्षनेत्या करणार का? याचे उत्तर द्यावे, असे पेडणेकर यांनी म्हंटले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, चंद्रकांतदादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. तरीही माझा हा सवाल आहे की, चंद्रकांतदादांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विरोधीसुखसनेत्या करणार का? याचे उत्तर द्यावे.
मुंबईत आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे त्यांचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा रश्मी वहिनी यांना देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असा टोला लगावला होता.