मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरूच; पोलिसांच्या धाडीत ४ लाख मास्क जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी काळाबाजार सुरु असून पोलिसांनी मास्कचा मोठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी अंधेरीत विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत ४ लाख मास्क जप्त केले आहेत. या साठ्याची एकूण किंमत जवळपास १ कोटी रूपये सांगितली जात आहे. माक्सचा अवैधरित्या साठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

करोनामुळे सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीमध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. या वस्तुंची टंचाई निर्माण होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात असताना मास्क आणि इतर वस्तुंचा काळाबाजार सुरू असल्याच आजच्या पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.