नखात रक्ताचे अंश सापडले अन् रिमाचा मारेकरी सापडला, काय आहे नेमके प्रकरण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आरोपीने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी पोलिसांच्या सुटत नसतो. अशीच एक घटना मुंबईच्या साकीनाका परिसरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या (Murder) केली मात्र त्याने मागे एकही पुरावा सोडला नाही त्यामुळे पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेणे अशक्य होते. पण शेवटी पोलीस ते छोट्याशा गोष्टीवरूनसुद्धा आरोपीचा माघ काढतात. यावेळी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेवून त्याच्या नखांची तपासणी केली तेव्हा त्याच्या नखात सुकलेल्या रक्ताचे अंश आढळून आले आणि पतीनेच पत्नीचा खून (Murder) केल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे प्रकरण ?
22 वर्षीय मृत रिमा यादव हिचे लग्न मनोज प्रजापती याच्याशी झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाला आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. या दरम्यान तिला काही काम नसल्याने तिला मदत म्हणून रोहित नावाचा एक व्यक्ती तिला जेवण आणि नाश्ता देत होता. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास रोहित याने रिमा करता आणलेले जेवण घेऊन ती राहत असलेल्या घरी गेला. तेव्हा रिमा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर तातडीने तिला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता. रिमाच्या गळ्यावर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले होते.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मृत रिमाच्या पतीची चौकशी केली असता तो त्यावेळेस तिथे नव्हता असे त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय पोलिसांकडेही त्याच्या विरोधात ठोस पुरावे नव्हते मात्र जेव्हा रिमा ज्या जंगलेश्वर मंदिराच्या मागे चाळीत राहत होती. तिथल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रिमाचा पती मनोज प्रजापती हा त्या भागातून जाताना एका सीसीटीव्ही दिसला. मात्र आपण कामावरुन घरी जात होतो असं उत्तर त्याने पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या नखात सुकलेल्या रक्ताचे अंश आढळले. यानंतर पोलिसांनी मनोजला ताब्यात घेऊन त्या रक्ताच्या अंशाची तपासणी केली असता ते रक्ताचे अंश आणि रिमाचे रक्त एकच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपी पतीने आपणच रीमाचा खून (Murder) केला असल्याचे कबुल केले. पोलिसांनी अवघ्या 5 तासाच्या आता रिमाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने अप्पर पोलीस आयुक्‍तांनी सर्व पोलिसांचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा :
अहो आश्चर्यम !! एकही नट-बोल्ट न वापरता बनवला आहे ‘हा’ ब्रीज

साताऱ्याचे जवान सुधीर निकम मुंबईत कर्तव्य बजावताना शहीद

SBI ने ‘या’ डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली 0.90% पर्यंत वाढ

‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा

Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट