मुंबई : हॅलो महाराष्ट्र- मागच्या 3 आठवड्यांपासून राज्यात पावसाने मोठा खोळंबा केला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते माध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
५ जुलै, हवामान अंदाज: शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता.
भरती
०९:२५ वाजता ३.५१ मी
२०:३७ वाजता ३.२४ मीओहोटी
१५:०० वाजता ०२.३५ मीगेल्या २४ तासात सरासरी पाऊस:
शहर: ०.५८ मिमी
पूर्व उपनगरे २.०३ मिमी
पश्चिम उपनगरे: १.३१ मिमी#MYBMCUpdates— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2021
हवामान खात्याने गेल्या २४ तासांतील सरासरी पावसाची नोंद वर्तवली आहे. यामध्ये मुंबई शहर: ०.५८ मिमी, पूर्व उपनगरे २.०३ मिमी, पश्चिम उपनगरे: १.३१ मिमी अशी नोंद वर्तवण्यात आली आहे.जुलै सुरू झाल्यापासून मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जवळपास तीन अंशांनी अधिक नोंद होत आहे. किमान तापमानातही साधारण दोन अंशांची वाढ होत आहे. पारा 33 अंशांच्या पुढील कमाल पातळीवर झेपावत आहे. याचदरम्यान हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही 80 टक्क्यांच्या पुढे राहत असल्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची प्रचंड लाहीलाही होत आहे.
Mumbai today morning …5 July
Cloudy..with few intense spells too..
May not sustain…a short time only.
Good rains expected over city week end onwards …
Will update pic.twitter.com/aTbyjhKZUZ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2021
मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या आठवड्याच्या शेवटी चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. यामुळे लवकरच पावसाला सुरुवात होईल. या आठवड्याच्या शेवटपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mumbai and around recd light to mid rains in last 24 hrs at 8 am on 5 July.
Morning cloudy sky with 1,2 showers around.
Trend very likely to continue pic.twitter.com/JDiwvV2vQN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2021
भरती
०९:२५ वाजता ३.५१ मी
२०:३७ वाजता ३.२४ मी
ओहोटी
१५:०० वाजता ०२.३५ मी