Sunday, January 29, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे; भातखळकर यांची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून आदल्या दिवशी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात ही परंपरा आहे. परंतु पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे आहेत.”

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी नवीन ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरे व ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, मुख्यमंत्र्यांचे धाडस झाले नाही कि त्यांनी पत्रकारांना संबोधित करावे. १७० आमदारांचा पाठींबा असून देखील त्यान्च्याकडे इतकेही संख्याबल नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवालही यावेळी भातखाळकरांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

 

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले होते कि, “मुख्यमंत्री ठाकरे हे राज्याला पुन्हा बन्दिराष्ट्र बनवू पाहत आहे. रोजीरोटी मिळवण्यासाठी पुन्हा झगडा सुरु होणार आहे.” भातखळकरांनी आशा प्रकारचे ट्विट करीत ठाकरे सरकारने लॉकडाऊनबाबतच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत टीका केली आहे.