मुंबई प्रतिनिधी |”शिवसेना भाजप नाल्यात पैसे खाते म्हणून मुंबईत पाणी जाते” असे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभावर चांगलीच टीका केली आहे. नाला सफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. त्यामुळे नाले तुंबतात आणि मुंबईकरांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
नाल्यात पाणी व्यवस्थित जात नसल्यानेच मुंबईची लोकल आणि बेस्ट बस उशिरा धावते त्याचा त्रास मुंबईकरांना भोगावा लागतो. लोकांना कामावर जाईल उशीर होतो. लोकांची विनाकारण अडवणूक होते. या सर्व समस्यांना शिवसेना आणि भाजपची धोरणे जबाबदार आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मागील आठवड्यापासून मुंबईमध्ये सतत पाऊस पडत आहे. पावसाचे संकट मुंबईकरांना त्यांच्या जीवनात अडथळा म्हणून उभा राहते आहे. अशातच मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलची सेवा देखील पावसामुळेच बंद ठेवावी लागते. अशातच हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस मुंबईला झोडपून काढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच पावसाने ग्रासलेल्या ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनची अवस्था अधिकच बिकट होणार आहे.