महाविकास आघाडीला धक्का : मुंबई हायकोर्टाने मलिकांच्या अर्जाची याचिका फेटाळली

Nawab Malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागेसाठी सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जस जशी मतदानाची वेळ संपत आहे तसतशी धाकधूक वाढत आहे. दरम्यान आज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टाने आज पुन्हा धक्का दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीची परवानगी नाकारल्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी हायकोर्टाने एक कैदी म्हणून तुम्हाला जामीन हमी दिली जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य कोर्टात अर्ज करावा लागेल.

पण हायकोर्टाच्या विशेष अधिकारातून आम्ही तुम्हाला कैदी म्हणून बंदोबस्तात केवळ मतदानासाठी जाण्याची परवानगी देऊ शकतो, पण तशी मागणी तुमच्याकडून याचिकेतून होणे गरजेचे आहे. त्याच सुनावणीसाठी हायकोर्टाकडून हा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिकांचे वकिल जामीनाची अट काढून तशी याचिका पुन्हा नव्याने दाखल करण्यात येणार होती. मात्र, त्यास विरोध दर्शवत आता तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे

नवाब मलिकांच्या याचिकेवर बंदोबस्तात जाऊ देण्याची मागणीच नसताना तो मुद्दा कसा? असा आक्षेप ईडीने घेतला आहे. नवाब मलिकांना ऐनवेळी मंजुरीची अपेक्षा होती. मात्र, आता नवाब मलिक व अनिल देशमुख या दोघांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे