मुंबई । महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी संबंधित लोकल ट्रेनमध्ये प्रवास आणि विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. गुरुवारी, हे ठरवण्यात आले आहे की, 18 वर्षांखालील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. पूर्वी, ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. सध्या देशात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड -19 विरुद्ध लस दिली जात आहे.
मुंबईत लवकरच शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यामध्ये विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, जेणेकरून ते वैयक्तिकरित्या वर्गांना उपस्थित राहू शकतील. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्सनुसार, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, जी लोकं कोणत्याही विशिष्ट आरोग्य समस्येमुळे ग्रस्त आहेत, त्यामुळे ते लस घेऊ शकत नाहीत, ते देखील डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवून ही सुविधा घेऊ शकतात.
रिपोर्ट्स नुसार, ज्यांना लस मिळाली नाही ते लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील, मॉल, मंदिरे (काही जिल्ह्यांमध्ये), रेस्टॉरंट्स, ऑडिटोरियम्स, विवाहस्थळे आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रवेश करू शकतील. यापूर्वी, पश्चिम रेल्वेने जाहीर केले होते की 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET आणि 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसाठी हॉल तिकिटांच्या दाखविल्यावर उपनगरीय रेल्वे तिकिटे दिली जातील.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते की,ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे ते 15 ऑगस्टपासून मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करू शकतील. मात्र, त्या काळात, मुख्यमंत्र्यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांच्या अंतरांची अटही ठेवली होती. त्या काळात केवळ विशेष पासधारकांनाच प्रवासाची परवानगी होती.
महाराष्ट्रात गुरुवारी कोविड -19 चे 2384 नवीन रुग्ण आढळले ,तर राज्यात 35 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकारी म्हणाले की, नवीन प्रकरणे आल्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 65,86,280 झाली आहे तर साथीच्या आजारामुळे आणखी 35 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 1,39,705 वर पोहोचला आहे.