हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील कोरोना संसर्गाचे दुप्पट होणे आता 100 दिवसांवर पोहोचले आहे. कोरोना वाढीचा दर 0.66 टक्के झाला आहे. दररोज नवीन कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोरोनाच्या दुसर्या लाटेवर झालेल्या संशोधनात असा दावा केला गेला आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोविडने मेलेल्यांची लोकांची संख्या वाढेल.
परंतु टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या परिणामामुळे मुंबईकरांना आशेचा मोठा किरण मिळाला आहे.या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार मुंबईत जर लस 75 टक्क्यांपर्यंत राहिली तर 1 जूनपर्यंत कोविडमधील मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी असेल. म्हणजेच आपण 1 जुन पर्यंत मुंबई मध्ये करोनाला आळा घालू शकतो असे त्यांचे मत आहे. परंतु त्यासाठी 75 टक्के लसीकरण होणे महत्त्वाचे आहे.
सध्या मुंबई हे करोना संक्रमित्यांच्या संख्येत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातच काय तर देशात अव्वल क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पुणे आणि नाशिकचा नंबर लागतो. करोनाला आळा घालण्यासाठी आता लसीकरनाचा वेग वाढविणे महत्वाचे आहे. जेवढे जास्त लसीकरण होणार तेवढा मृत्युदर हा कमी कमी होत जाणार असे संशोधकांचे म्हणणे आहे.