औरंगाबाद – राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचे प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग जाहीर झाले, सुनावणी, हरकती ही झाल्या प्रभागानुसार इच्छुक कामालाही लागले. मात्र, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरूच आहे. अगोदर संगणकात तर्फे जनरेट होणारी तारीख 3 मार्च होती. आता 30 मार्च करण्यात आल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले.
जानेवारी 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड आरक्षण, वॉर्ड रचनेची प्रक्रिया पूर्ण केली होती. ही प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अलीकडेच राज्य शासनाने कायद्यात बदल करत प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात शपथपत्र ही दाखल केले.
3 मार्च रोजी संगणकातर्फे जनरेट होणारी तारीख पडली. मात्र, संगणकातर्फे जनरेट होणारी तारीख आता 30 मार्च झाल्याचे राजूरकर यांनी सांगितले. संगणकातर्फे जनरेट केल्या तारखेनुसार याचिका बोर्डावर येत नाही. रजिस्ट्रारमार्फत बोर्डावर लावण्यात आलेल्या काही प्रकरणांची सुनावणी होते.