म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान

SIP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : आपले रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले जातात. यामध्ये बँकेची एफडी किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे चांगले रिटर्न्स मिळतात. याबरोबरच म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही गुंतवणूक केली जाते. हे जाणून घ्या कि, गेल्या काही वर्षांत काही एसआयपीने लोकांना 12 ते 14 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न मिळवून दिला आहे. मात्र, योग्य माहिती न घेता एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे हे नुकसानीचे देखील ठरू शकते. त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

Should You Stop or Continue Your SIP in the Current Market Scenario?

आर्थिक उद्दिष्टे लक्षात ठेवा

कोणत्याही व्यक्तीकडून आपले एखादे ध्येय साध्य करण्यासाठी SIP मध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना नेहमी आपले ध्येय लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाचे मुख्य उद्दिष्ट हे शिस्तबद्ध पद्धतीने आपले आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे आहे. जर आपलटला असुरक्षित वाटत असेल आणि तरीही आपण यामध्ये पैसे गुंतवत राहिला तर याद्वारे आपल्याला मोठ्या नुकसानीलाही सामोरे जाऊ लागू शकते.

Top 3 Benefits Of Systematic Investment Plan SIP In Mutual Funds

पैसे कधी काढावे ???

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीपेक्षाही आपण त्यामधून पैसे कधी काढता हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्या कि, जर आपला म्युच्युअल फंड हा सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस किंवा वर्षभर खराब कामगिरी करत असेल तर त्यामधून पैसे काढणे शहाणपणाचे ठरेल. कारण जर जास्त रिटर्न मिळवण्याच्या नादात आपण मूळ रक्कमही गमावू शकाल.

5 SIP Myths You Need To Break

फंडाची निवड कशी करावी ???

हे लक्षात घ्या कि, SIP म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड, लिक्विड फंड किंवा मल्टी-कॅप्स यांसारख्या फंडांचा समावेश आहे. यामध्ये आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊनच फंडाची निवड करावी लागेल. जर आपल्याला कुठेतरी फिरायला करण्यासाठी शॉर्ट टर्म एसआयपी घ्यायची असेल, तर लिक्विड फंड किंवा डेट फंड जास्त चांगला ठरेल. तसेच जर मुलांचे लग्न, रिटार्यमेंट प्लॅनिंग किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येईल.

Why Investing in SIPs Needs to be a Long-Term Affair

फंड मॅनेजर शोधा

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याआधी म्युच्युअल फंडामध्ये चांगले रिटर्न देणारे मॅनेजर तपासले पाहिजेत. यासाठी संबंधित फंड मॅनेजरचा इतिहास, खर्चाचे प्रमाण नीट समजून घ्या. तरच उत्तम SIP निवडू शकाल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbimf.com/sip#:~:text=A%20Systematic%20Investment%20Plan%20(SIP,the%20selected%20mutual%20fund%20scheme.

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ