हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Funds : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वाना बचतीचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी बचत करण्याला प्राधान्य देत आहे. मात्र प्रत्येकाला भरपूर रिटर्न देणाऱ्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवायचे असतात. यासाठी म्युच्युअल फंडाची निवड केली जाते. ज्यामुळे आजकाल म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचेही पहायला मिळत आहे. कारण म्युच्युअल फंडस् हे एफडीपेक्षा जास्त रिटर्न देतात. सध्या बाजारात गुंतवणुकीचे असे पर्याय देखील आहेत जिथे गुंतवणूकदारांचे पैसे 5 वर्षात 3 पट झाले आहेत. म्युच्युअल फंडाच्या काही इक्विटी प्लॅन्सने तर 5 वर्षांतच 25 ते 26 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे. चला तर मग आज आपण कोणत्या म्युच्युअल फंडांमध्ये चांगला रिटर्न मिळेल हे जाणून घेउयात…
SBI Technology Opportunities Fund
या फंडाचे नाव 5 वर्षात मोठा रिटर्न देणाऱ्या फंडांच्या (Mutual Funds) लिस्टमध्ये समाविष्ट आहे. यामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षे एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना 24.36 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला आहे. तसेच या फंडाने SIP द्वारे गुंतवणुकीसाठी 23.42 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच पाच वर्षांत या फंडाने 1 लाख रुपयांची किंमत वाढवून 3 लाख रुपये केली आहे.
Tata Digital India Fund – Regular Plan
ज्या गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये (Mutual Funds) एकरकमी गुंतवणूक केली त्यांना 5 वर्षांत 25.67 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडाने 24.01 टक्के रिटर्न दिला. 5 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये तिपटीने वाढून 3.13 लाख रुपये झाले आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी या फंडाची AUM 5888 कोटी रुपये होती. या फंडामध्ये 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.
Aditya Birla Sun Life Digital India Fund
गेल्या पाच वर्षांत या फंडाने (Mutual Funds) गुंतवणूकदारांना तिप्पट नफा मिळवून दिला आहे. तसेच यामध्ये एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 24.71 टक्के रिटर्न मिळाला आहे. त्याच बरोबर एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडाने 23.96 टक्के रिटर्न दिला आहे. यामध्ये 5 वर्षांपूर्वी गुंतवलेले 1 लाख रुपये तीन पटीने वाढून 3.01 लाख रुपये झाले आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी या फंडाची AUM 3036 कोटी रुपये होती. या फंडात 1000 रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.
ICICI Prudential Technology Fund
या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 26.29 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच या फंडाने (Mutual Funds) एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना 25.58 टक्के रिटर्न दिला आहे. 5 वर्षांपूर्वी गुंतवलेल्या 1 लाख रुपयांवरून 3.21 लाख रुपये झाले आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी या फंडाची AUM 8693 कोटी रुपये होती. या फंडात 5,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicipruamc.com/mutual-fund/equity-funds/icici-prudential-technology-fund
हे पण वाचा :
5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!
Multibagger Stock : 1 वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल
FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज
गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!