म्युच्युअल फंडस् 1 जुलैपर्यंत कोणतीही नवीन स्कीम लाँच करू शकणार नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड हाऊसेस 1 जुलै 2022 पर्यंत कोणतीही नवीन योजना सुरू करू शकणार नाहीत. बाजार नियामक सेबीने यावर बंदी घातली आहे. सेबीने म्युच्युअल फंडांची संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (AMFI) या संस्थेला पत्र पाठवून या बंदीबाबतची माहिती दिली आहे. या पत्रात असे म्हटले गेले आहे की, जोपर्यंत पूल अकाउंट्सचा वापर पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत फंड हाऊसेस नवीन योजना सुरू करू शकत नाहीत.

काही म्युच्युअल फंड हाऊसेस गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या रकमेचा गैरवापर करत असल्याचे सेबी (स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ला आढळून आले होते. त्यामुळे काही काळापूर्वी अशा फंड हाऊसना नियामकाने निर्देश दिले होते की, कोणताही डिस्ट्रीब्यूटर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, स्टॉक ब्रोकर किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरला गुंतवणूकदारांचे पैसे बँकेच्या खात्यात टाकून ते पुन्हा फंड हाउसद्वारे गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योजनेचे युनिट्स खरेदी करता नाही आले पाहिजे.

पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी उचलली पावले
गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी सेबीने नवीन तरतूद केली आहे. हा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार होता. मात्र AMFI ने या नियमाच्या अंमलबजावणीची शेवटची तारीख वाढवण्याची विनंती सेबीला केली होती. AMFI चा मुद्दा असा होता की, ब्रोकिंग आणि डिस्ट्रीब्यूटर एजन्सी या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यायी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अद्याप पूर्ण व्यवस्था करू शकलेल्या नाहीत.

या आवाहनावर सेबीने म्युच्युअल फंडांसाठी नवीन सूचना जारी करताना 1 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यासोबतच, AMFI ला आपल्या पत्रात त्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे ज्यात संस्थेने पूल अकाउंट्सचा प्रश्न सुटेपर्यंत सर्व नवीन योजनांवर बंदी घातली जाईल असे म्हटले होते.

Leave a Comment