नागपूर हादरलं ! जावायाने घरगुती वादातून मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

0
132
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काल मध्यरात्री दुहेरी हत्याकांड (murder) घडल्यामुळे नागपूर हादरलं आहे. यामध्ये आरोपी जावयाने सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या (murder) केली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केले. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अमर नगर भागामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण?
नरमू यादव असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलले आहे. या आरोपीने भगवान रेवारे व सासू पुष्पा रेवारे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या (murder) केली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मुस्कान या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर आरोपीनं मुलगा महेंद्र नरकू याला कोणतीही इजा पोहचवली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपीचे मागील दोन-तीन दिवसांपासून पत्नीशी सतत भांडण सुरू होते. रात्री 12.30 च्या सुमारास त्याने पत्नीशी भांडण सुरु केले. तिला मारहाण केली भांडण सोडवायला आधी सासरा धावला तर त्याला कुऱ्हाडीने ठार (murder) केले नंतर घरातून पत्नीला ओढत बाहेर काढले सासू भांडण सोडवायला धावली घरासमोर रस्त्यावर सासूला सुद्धा कुऱ्हाड व दगडाने मारून ठार (murder) केले. पत्नीच्या खांद्यावर सुद्धा कुऱ्हाडीने वार केला व दगडाने डोक्यावर मारहाण केली. यानंतर आरोपीने सर्व मेल्याची खात्री झाल्यावर स्वतः चे रक्ताने माखलेले कपडे बदलून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गावकऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.

हे पण वाचा :
मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

जितेंद्र आव्हाडांच स्वप्न होणार साकार; ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची दमदार घोषणा

च्यायला ! मी कधी जातीयवादी पोस्ट केली..?; नेटकऱ्याच्या मॅसेजवर किरण माने वैतागले

ऊसाची उंची जाडी वाढावी यासाठी काय करावे?

उदय सामंत गुवाहाटीला रवाना; शिवसेनेला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here