हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये नागराज मंजुळे यांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात. ‘झुंड’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटानंतर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यास मंजुळे यांनी सुरुवात केली आहे. खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार चित्रपटामधून दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर मंजुळे यांनी त्यांच्या इंट्राग्रामवरून शेअर केले आहे.
सध्या नागराज ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जिओ स्टुडिओची निर्मिती असलेल्या विविध भाषांमधील आगामी 100 चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यावेळी मंजुळे यांनी आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाची घोषणा केली.
‘खाशाबा’ चित्रपट 1952 हेलसिंकी येथील मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावातील फ्रीस्टाइल कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे.
https://www.instagram.com/p/CrSZtkWNB8T/?utm_source=ig_web_copy_link
सध्या प्रचंड चर्चेत असलेले नागराज मंजुळे हे त्यांचा आगामी चित्रपट घेऊन लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा चित्रपट ‘खाशाबा’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कोल्हापूरमध्ये नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता नागराज यांनी त्यांच्या नव्या बायोपिक खाशाबा चित्रपटाची घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या ते तयारीमध्ये आहेत.
5 वर्षांपासून चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न : रणजित जाधव
वडील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित एखादा चित्रपट निघावा अशी इच्छा होती. त्यासाठी पाच वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरु होते. पाच वर्षांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यास आज मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास मंजुळे सुरुवात करतील, अशी माहिती प[पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
नागराज मंजुळेंनी चित्रपटाबाबत केलेली घोषणा पहा Click
कोण असणार पात्र?
मराठीतील रांगड्या अशा भाषेत तयार करण्यात येत असलेल्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील ‘खाशाबा’ या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात कोण कोण पात्र असणार? पैलवान खाशाबा जाधव यांची मुख्य भूमिका कोण साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
खाशाबा जाधव यांच्याबद्दल जाणून घ्या…
देश स्वतंत्र झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व. त्यातील एक हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि दुसरे कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव. मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. खाशाबा यांच्या आधीच्या वर्षांमध्ये भारत हॉकी या सांघिक खेळात सुवर्णपदक जिंकत होता.सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी १९४८ मध्ये लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. त्यानंतर १९५२ मध्ये हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.