नाना पाटेकर म्हणाले, माझी आई माझ्याकडे राहत नव्हती…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | माझी आई 99 वर्षाची होवून चार वर्षापूर्वी गेली. मला लोक विचारायचे नाना तुमची आई तुमच्याकडे राहते का? तेव्हा मला आईने 67 वर्ष आईने सांभाळले. परंतु या प्रश्नावर मी म्हणायचो माझी आई माझ्याकडे राहत नाही, तर मी म्हणायचो मी आईकडे राहतो. आपण एवढे कधीच मोठे होवू शकत नाही, की आपण आई- वडिलांना सांभाळू शकू. आपली तेवढी लायकी नाही, असे रोखठोक मत सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी मांडले.

कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा 42 वा युवा महोत्सावाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अॅड. रविंद्र पवार, नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर, सुधीर चिवटे, गणेश थोरात, कॅप्टन आशा शिंदे, प्रविण पाटील, प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, मोहन राजमाने, प्रातांधिकारी उत्तम दिघे, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाडे, कणकवलीचे जिल्हाधिकारी वैशाली राजमाने, कराड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, अॅड. सदानंद चिंगळे, जितेंद्र डुंबल, अतुल कदम, सरपंच फत्तेसिंह जाधव आदी उपस्थित होते.

नाना पाटेकर म्हणाले, आई- वडिलच आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतात. तुम्ही कितीही चुकीचे वागला तरी तुम्हांला दूषणे देणार नाहीत. देवाकडे चांगल्यासाठीच त्याचे हात जोडले जातील. तेव्हा आपली जबाबदारी आहे की नाही. प्रत्येकाला वाटले पाहिजे कधी एकदा मोठे होतो अन् त्यांचे पांग फेडतो. देवळात कधी जावू नका, घरातच दोन देव आहेत. त्यांची पूजा करा, सगळं काही गवसेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मोहन राजमाने यांनी केले. सूत्रसंचालन कोमल कुंदप, सुनिल जाधव यांनी केले. आभार डाॅ. आर. बी. गुरव मानले.