शिंदे सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात’; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

eknath shinde nana patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले (Nana Patole) हे राज्यातील शिंदे- फडणवीससरकार बरखास्त करावे यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटदेखील नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी केला. याबरोबर महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातला जात आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. उद्या हे मुंबई देखील गुजरातला देतील असा गंभीर आरोपसुद्धा त्यांनी या सरकारवर केला आहे.

महाराष्ट्राला उध्वस्त करणारे शिंदे-फडणवीस सरकार
यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला उध्वस्त करणारे शिंदे-फडणवीस सरकार अशी जोरदार टीका त्यांनी (Nana Patole) केली. दिवाळीच्या आनंद शिधामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला. राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

टाटा एअर बसवरूनही जोरदार टीका
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी ‘ईडी’चा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. यानंतर शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले असल्याची टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी केली.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती