Thursday, October 6, 2022

Buy now

मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो; नाना पटोलेंचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्या नंतर सर्वच स्तरातून नाना पटोले यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो असे नाना पटोले म्हणाले.

आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्या व्हिडीओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.

दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप कडून केली जात आहे. तर हीच का काँग्रेस संस्कृती असा सवाल भाजप नेते करत आहेत.