हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. काँग्रेसकडूनही निवडणुकीची तयारी केली जात असल्याने याबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. महाराष्ट्र काँग्रेसमढील नेत्यांमध्ये गडबड असल्याची जी चरचा आहे. याबाबत पटोले यांनी माहिती दिली. यावेळी पटोले यांनी भाजपवर व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई येथे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते फडणवीसांवर टीका करताना म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार कोरोनात लसी देण्यात अपयशी ठरले आहे. काल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकले. त्यावेळी विधानपरिषदेचे सदस्य नारायण राणे होते. सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरच्या मुन्ना यादव याचा उल्लेख करीत खोटे बोलले कि मुन्ना यादव याच्यावर गुन्हे आहेत. महाराष्ट्राने खोट बोलणारा मुख्यमंत्री पाहिला आहे, अशी टीका पटोले यांनी फडणवीस यांच्यावर यावेळी केली.
पटोले यांनी यावेळी भाजपला बहुजन विरोधी पक्ष असल्याचेही म्हंटले. भाजपकडून बहुजनांचा केवळ वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. याबाबत आपण सभागृहात भूमिकाही मांडत आलो असल्याचे पटोले यांनी यावेळी म्हंटले.