हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. पटोलेंनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे, अशी टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावरून पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचा फोटो ट्वीट करत मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. त्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेत. महाराजांच्या पुतळ्यासमोर मोदी फोटोमध्ये छोटे दिसत आहे. या फोटोवरुनच नाना पटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे आहात, असा टोला लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे. #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा pic.twitter.com/HGaQW1jtaG
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 6, 2022
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या उदघाटनानंतर मेट्रोतून विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना त्यांनी मास्क वापरलेले नव्हते. तर विद्यार्थ्यांनी मास्क घेतले होते. यावरून काँग्रेस नेते पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रातील समजूतदार विद्यार्थ्यांनीही मास्क वापरला, असे ट्विट करीत पटोले यांनी मोदीवर टीका केली आहे.