हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांचा वध नथुराम गोडसेने केला,” असा उल्लेख पटोले यांनी केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमास नाना पटोले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान एक वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले की, आजच्या दिवशी पहिला आतंकवादी या देशामध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येच्या निमित्ताने नथुराम गोडसे नावाने पुढे आला. आणि आजच्या दिवशी महात्मा गांधी यांचा वध नथुराम गोडसेनी केला, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पटोले यांच्याकडून भाषणादरम्यान केल्या गेलेल्या उल्लेखामुळे यावर आक्षेप घेतला जात आहे. भाजप नेत्यांकडून आता पटोलेंवर निशाणा साधला जाणार यात शंका नाही. यापूर्वीही पटोले यांनी मोदी असा उल्लेख केल्यानंतर भाजप नेत्यांकडन राज्यभर आंदोलने करण्यात आली होती.